परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे आज दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी नेताजी सुभाष विद्यालय, बाभळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. एस. चव्हाण सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मंचकराव हरकळ, शालेय समितीचे अध्यक्ष भिवश्याम आव्हाड, माजी सरपंच कुंडलिकराव सोगे तसेच अशोकराव गिराम हे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. श्री. एस. एस. चव्हाण सर, श्री. कडतन सर, श्री. रोडगे सर तसेच मुख्याध्यापक जी. एस. चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. मंचकराव हरकळ यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळेतील सेवक बी. बी. जोगदंड, आर. बी. मेढे व लिपिक आर्दड सर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. आगामी शालांत परीक्षेसाठी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी वैष्णवी गिराम व रनेर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
