प्रतिनिधी, मुंबई:( गणेश ठाकरे)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज, १४ मे २०२६ रोजी मुंबईतील विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) उत्साहात पार पडला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची अधिकृत शपथ दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह महायुती आणि विरोधी पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते, आमदार आणि नवनिर्वाचित सदस्यांचे कुटुंबीय या सोहळ्याचे साक्षीदार बनले.
शपथ घेतलेले १० नवनिर्वाचित आमदार:
१. डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना)
२. बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष)
३. अंबादास दानवे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४. झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - NCP)
५. प्रज्ञा राजीव सातव (भारतीय जनता पक्ष)
६. प्रमोद जठार (भारतीय जनता पक्ष)
७. माधवी नाईक (भारतीय जनता पक्ष)
८. सुनील कर्जतकर (भारतीय जनता पक्ष)
९. विवेक कोल्हे (भारतीय जनता पक्ष)
१०. संजय भेंडे (भारतीय जनता पक्ष)
या सोहळ्यात भाजपचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी पारंपरिक टोपी परिधान करून आमदारकीची शपथ घेतली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर नवनिर्वाचित सदस्य प्रमोद जठार यांनी 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' यांचे स्मरण करत ईश्वर साक्ष शपथ घेतली.
शपथविधीनंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रधानमंत्री यांच्या इंधन वाचवा सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोटरसायकल विधान भवनामध्ये प्रवेश केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार प्रज्ञा सातम यांनी मेट्रो रेल्वे ने प्रवास केला तर बच्चुभाऊ कडू यांनी शपथविधीनंतर पायी प्रवास केला.
