*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा १८वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न*



परभणी (प्रतिनिधी) –रमेश मुलगीर 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्था, परभणीचा १८ वा वर्धापन दिन संस्थेच्या सभागृहात, जनप्रिय कॉलनी, कारेगाव रोड, उघडा महादेव परिसर, परभणी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे होते, तर उद्घाटक म्हणून पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक अ‍ॅड. एन. व्ही. पिंपळगावकर साहेब उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे माजी चेअरमन बी. आर. आव्हाड, माजी सचिव एम. जी. कठाळे, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब जल्लारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एम. एम. भरणे, संस्थेच्या सचिव सविता रोडे, संचालक बलभीम माथेले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सविता रोडे यांनी केले. बी. आर. आव्हाड, जल्लारे सर, भरणे साहेब, पिंपळगावकर साहेब व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशा शुभेच्छा संस्थेला व सर्व सभासदांना देण्यात आल्या.

यावेळी संस्था स्थापन करणाऱ्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी, तत्कालीन संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व मासिक ठेवीदार यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या सर्व सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

संस्थेचे संचालक माथेले सर यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत १००० सभासद संख्या ओलांडण्याचा निश्चय व्यक्त केला. संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सभासदांसमोर सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ झुडपे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक मधुकर मस्के, मायादेवी गायकवाड, कमल दवंडे, चंदा खंदारे, छाया गायकवाड, दिमाताई हरबडे, उत्तम घुगे, उत्तम सुतार, शंकर काळे, हर्षवर्धन कांबळे, संदेश कांबळे, सोपान सीताफुले तसेच मॉर्निंग वॉक टीमचे अध्यक्ष मस्के, गोदाम साहेब, डी. आर. जाधव, दी. फ. लोढे, दशरथ गायकवाड, बालासाहेब कांबळे, तुळशीराम सावंत सर, साहेबराव धोत्रे, संस्थेचे कर्मचारी ज्योती भोळे, स्वप्निल जाधव, अनुप्रिया वावळे, ज्योती गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक विशाल प्रधान यांनी केले. कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.