श्रीक्षेत्र माहूर प्रवीण बरडे
माहूर तालुक्यातील मौजे आष्टा ता.माहूर जि.नांदेड येथील गायरान जमिनीवर सर्वे नं./ गट नं. २११ याचे क्षेत्रफळ १२.१३ असून कोणतीही पूर्वपरवानगी किंवा कायद्याने आवश्यक असलेल्या मंजुरीशिवाय तत्कालीन ग्रामसेवक व्ही. एस. जाधव यांनी प्रति व्यक्ती ५०,००० रुपये घेऊन मालकी हक्क देण्याची खोटी हमी दिली आहे. हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २०, २६ व ३६ नुसार पूर्णत बेकायदेशीर असल्याने ग्रामसेवकाची चौकशी करण्यासाठी मौजे आष्टा येथील शिवराज प्रेमसिंग राठोड हे दि 1 .3.2026 रोजी आमरण उपोषणास बसले आहेत दुसरा दिवस असूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही
गाव नमुना ८-अ वर चुकीची नोंदणी करून स्थानिकांना फसवले असून, यामुळे शासनाचे आर्थिक व कायदेशीर नुकसान झाले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम १३ अंतर्गत गुन्हा आहे.
ग्रामसेवक व्ही. एस. जाधव यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जागतिक नागरी संरक्षण दि १ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कारवाईची माहिती द्यावी असे निवेदन दिले होते परंतु अधिकाऱ्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी दि 1 रोजी आमरण उपोषणास प्रारंभ केला असून दुसऱ्या दिवशी दखल घेतली नसल्याने भ्रष्टाचाराची पाळे मुळे खोलवर रुजलेली असल्याची चर्चा होत आहे
उपोषण स्थळी गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर टाकरस साहेब यांनी भेट देऊन उपोषणाची समजूत काढून त्यांना न्याय देण्याबद्दलचे पत्र देण्यात आल्याने मौजे आष्टा येथील उपोषण करते शिवराज राठोड यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे
