: राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराने शरद लोहकरे यांचा गौरव




प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव 


 भारतमाता संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत वंचित घटकांचा सन्मान करण्याचे तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य करणारे लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शरद दामोधर लोहकरे यांना ‘राष्ट्रीय समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त हॉटेल सेलिब्रेटी, नाशिक येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा डॉ. आशाताई पाटील, राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. ज्योतीताई केदारे शिंदे, येवला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेना नेते तथा नगरसेवक अजय बोरस्ते, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश चौधरी, राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप फडोळ, अनिल गिरणारे, राष्ट्रीय प्रवक्ता संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 लोहकरे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल निफाड तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.