प्रवीण बरडे माहूर (प्रतिनिधी)
माहुर भाजपचे तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर व शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे यांचे नेतृत्वातील शिष्टमंडळाने दि.८ डिसें.रोजी तहसीलदार किशोर यादव यांची भेट घेऊन त्यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे.त्यात मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हरभरा, तुर,गहू, फळ भाज्या आदी रब्बी व बारमाही पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी केलेला अहवाल घेऊन त्यांना सरसकट आर्थिक मदत व दुबार पेरणी करण्याची पाळी आल्याने हरभरा, गहू आदी पिकांचे निःशुल्क बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
माहूर भाजपने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात अतिवृष्टी व दूषित वातावरणाने कापूस,तुर,ज्वारी या खरीप व अवकाळी पावसाने हरभरा, गहू आणि बारमाही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची व्यथा मांडली आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे,तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे,सोशल मीडिया प्रमुख राहुल चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.