कोपरगावच्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी नगरपरिषदेला जनतेशी काही घेणं देणं नाही


(रहीम खान पठाण)- प्रतिनिधी-

 कोपरगाव नगर परिषदेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा अतिशय दुर्गंधीयुक्त व गढूळ केला जात असून शहरातील सव्वा लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याची कुठलीही काळजी नगर परिषद प्रशासन यांना नाहि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसून प्रशासक हेच कोपरगावचे सर्वेसर्वा आहे त्यांचाही कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यावर वचक राहिलेला नसून शहरवासीयामध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे सध्या शहराला आठवड्यातून फक्त एकच वेळेस अनियमित पाणीपुरवठा केला जातो व वर्षाची संपूर्ण नळपट्टी भरण्यास नागरिकांना भाग पाडले जाते  केंद्र सरकार मार्फत जलजीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन वर्षापासून पूर्ण झाली आहे  याबाबत नगरपरिषद पुरेशी माहिती जनतेला देत नाही परंतु कुठलीही चाचणी घेण्यात आलेली नाही ?जलशुद्धीकरण केंद्रावर अद्यावत यंत्रणा आहे की नाही पाणी शुद्धीकरण केले जात की नाही यावर अंकुश ठेवणार कोण ? याबाबत कोपरगाव शहरवासी यांचे भावना तीव्र झालेले आहे याबाबत मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांनी ठोस पावले उचलावी व शहराला शुद्ध पाणीपुरवठा करावा ही