शेळगाव येथे खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 


( किरण माने इंदापूर प्रतिनिधी )

     शेळगाव : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगाव येथे (दि१२) रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

       श्री संत मुक्ताबाई मंदिराच्या प्रांगणात तसेच शेळगाव येथील स्मशानभूमी परिसरामध्ये देशाचे कृषिमंत्री तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त ८३ मोठ्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये जर गावातील एखादी व्यक्ती मृत्यू पावला तर त्यांच्या परिवारातील व्यक्तीने  मृतांच्या स्मरणार्थ कमीत कमी एक झाड लावावे. हा उपक्रम ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात  येणार आहे. आपल्याला झाडांचे महत्त्व हे येणाऱ्या दहा वर्षांनी समजेल असेही पुढे  चंद्रकांत जगताप म्हणाले.

     यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव शिंगाडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप, पर्यावरण प्रेमी भजनदास पवार, समता परिषदेचे अध्यक्ष राहुल जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ.निलेश शिंगाडे,प्रताप चवरे,मोहन खराडे, मोहन दुधाळ,तात्यासाहेब शिंगाडे, किसन जाधव,प्रशांत भुजबळ,सागर वाघमोडे , स्वाती शिंगाडे, प्रणिता जाधव,वैशाली जाधव,रतन ननवरे,सोमनाथ शिंगाडे मनोहर शिंगाडे, मिलिंद जाधव, विठ्ठल शिंगाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.