शेळगाव ते व्याहाळी सह इतर दोन रस्त्याला २३ कोटी निधी मंजूर


(किरण माने इंदापूर प्रतिनिधी )

     शेळगाव : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी बजेटमध्ये इंदापूर तालुक्यातील १२ रस्ते व ४ पूल बांधकाम तसेच तालुक्यातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचे व हजरत चांदशहवलीबाबा दर्ग्याच्या सुशोभीकरणासाठी सुमारे १०८ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

      शेळगाव येथील ग्रामस्थांनी रविवार (दिनांक १०) रोजी भरणेवाडी येथील निवासस्थानी जाऊन माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.शेळगावच्या ग्रामविकासासाठी दत्तामामा भरणे हे सातत्याने निधी उपलब्ध करून देत असतात  यामुळे आमच्या शेळगाव गावाच्या विकासात भर पडत आहे. तसेच आत्तापर्यंत सुमारे १०० कोटी अधिक निधी मामांच्या माध्यमातून मिळाला आहे,असे छत्रपती कारखान्याचे  संचालक आणि  राष्ट्रवादीचे नेते ॲड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी सांगितले.

      इंदापूर तालुक्यातील शेळगाव ते व्याहाळी रस्त्यासाठी २ कोटी , शेळगाव ते निमसाखर  रस्त्यासाठी १६ कोटी आणि शेळगाव ते भरणेवाडी रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर झाला आहे. रस्त्यांच्या निधीची मंजुरी झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे टिकाऊ व दर्जेदार व्हावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

      इंदापूर तालुक्यासाठी सुमारे १०८ कोटी रुपये निधीची मंजूरी केल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांचे जनतेतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

     यावेळी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ॲड लक्ष्मणराव शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप चवरे, राष्ट्रवादीचे युवानेते वैभव शिंगाडे, किसन जाधव, छगन शिंगाडे, भिवा जाधव, विठ्ठल शिंगाडे, अक्षय शिंगाडे,शहाजी शिंगाडे, श्रावणकुमार जाधव यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित उपस्थित होते.