नुकतेच आंतर जिल्हा बदली पोर्टल सुरू झालेले आहे तरी या पोर्टलमध्ये सन २०२२-२३ चे रोस्टर अपडेट करण्यात आले आहे तरी या रोस्टरनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये ओपन प्रवर्गाच्या जागा चक्क १११४ अतिरिक्त दाखवण्यात आलेले आहे हेच नेमके कारण अजून पर्यंत समजू शकले नाही कारण २०२१-२२ नुसार रोस्टरमध्ये ओपन प्रवर्गाच्या जागा शून्य होत्या तर एका वर्षामध्ये १११४ शिक्षक अतिरिक्त झाले कसे? यात शंका उपस्थित झाली व संशय सुद्धा वाढलेला आहे नेमके कोणते अधिकारी ओपन प्रवर्गावर अन्याय करीत आहेत हे कारण अद्याप समजू शकलेले नाही तरी तात्काळ याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा आंतरजिल्हा बदलीने येणारे शिक्षक व नवीन शिक्षक भरतीने रुजू होणारे शिक्षक याविरुद्ध कोर्टात जाण्याच्या तयारीत आसुन लवकरच मोठ्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत .