प्रवीण बरडे माहूर :प्रतिनिधी
विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मागनि खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभाथ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक (SIT) लागु करण्यात यावे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समिती मध्ये वि.जा (अ) प्रवर्गातील एका तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणुन नेमणूक देण्यात यावी. दि.२४ नोव्हेंबर २०१७ चा महाराष्ट्र शासनाकडुन निर्गमित झालेला रक्त नाते संबंधाचा निकश लावुन जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय (GR) त्वरित रद्द करण्यात यावा. संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुकानिहाय जिल्ह्याची यादी शासना मार्फत त्वरीत जाहीर करण्यात यावी.राज्य मागास अहवाल क्र.४९/२०१४ लागू करण्यात यावा.महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी माहूर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
दि.१३ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी गोर सेना व सकल विमुक्त जाती (अ) च्या वतिने ८ डिसेंबर २०२१३ ला प्रा. संदेश भाऊ चव्हाण, राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागपुर येथे हिवाळी अधिवेशानादरम्यान विमुक्त जाती (अ) मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चामध्ये संपुर्ण महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले असतांना गोर सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर ३.३० वाजेची वेळ दिली होती, परंतु ३.३० वाजता निवेदन कर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी सावे (बहुजन कल्याण मंत्री) विधिमंडळात हजर असतांनाही निवेदन स्विकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांने सुध्दा वेळ दिला नाही करीता हि बाब संपुर्ण महाराष्ट्रातील कोटी विमुक्त जाती (अ) प्रवर्गातीज लोकांची हेतुपुर्वक दखल घेत नसल्याने निदर्शनात आले. या घटनेचा निषेध म्हणुन गोर सेना व सकल विमुक्त जाती (अ) च्या वतिने शिंदे, फडवणीस, अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन माहूर शहरात अनेक कार्यकर्त्याच्या उपस्थिमध्ये करण्यात आले.
मंत्र्याच्या या कृतीमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ५ कोटी विमुक्त प्रवर्गातील लोकांच्या भावनेचा या संवेदनाहिन सरकारने भावनिक छळ केलेला आहे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल ६२ विधानसभा मतदार संघात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील लोकांच्या मदानामुळे आमदार निवडुन येतात परंतु हे आमदार आम्हां मतदाराची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. म्हणुन येता २०२४ निवडुनिमध्ये या सगळ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवु असे आंदोलन कर्त्यांनी आपले विचार व्यक्त करतांनी म्हटले आहे. समनक जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष प्रा.रवी राठोड यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शवला.यावेळी गोर सेनेचे माहूर तालुकाध्यक्ष आशिष राठोड, प्रल्हाद राठोड अर्जुन पवार, प्रदीप पवार, अरविंद राठोड,(स.ज.पा.प्रसीद्धी प्रमुख) सचिन नायक, यादव आडे, आकाश नायक, निकेश राठोड,अर्जुन चव्हाण,गजानन राठोड, प्रल्हाद कारभारी,राम राठोड,किशोर राठोड गणेश राठोड, बंटी राठोड,विठ्ठल राठोड, मिथुन राठोड ,रमेश जाधव, रुपेश राठोड यांचेसह गोरसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.