या पाच दिवशीय प्रशिक्षणाची सुरुवात जनता विद्यालय इगतपुरी येथे दिनांक १२ डिसेंबर २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत पहिला टप्पा पहिली ते पाचवी अध्यापन करणारे शिक्षक यांच्यासाठी सुरू झालेली आहे या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी थेटे ,श्री सतीश टेकोडे ,श्रीमती मोनाली देशमुख ,श्री वैभव रेवगडे, श्री रवींद्र चव्हाण श्री विशाल सोनवणे, श्रीमती सोनाली निकम ,श्रीमती सोनाली नवले, श्री आणि शेख हे असून या प्रशिक्षणाचे प्रमुख म्हणून श्री मुंढे साहेब, श्री आहिरे साहेब ,श्री सोनवणे साहेब, श्री दराडे साहेब ,श्री नांदुरकर साहेब केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी हे आहेत तसेच या प्रशिक्षणासाठी चार बीट प्रमाणे १६० प्रशिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत तरी या प्रशिक्षणामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे व नवीन सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन हे पद्धती कशा प्रकारची आहे याविषयी सविस्तर माहिती व ओळख करुन दिली जाणार आहे प्रशिक्षणासाठी इगतपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील साहेब साहेब हे पूर्णवेळ स्वतः उपस्थित राहून प्रशिक्षण उत्कृष्टपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली.