सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
तालुक्यातील मुरडे रामवाडी येथे आयोजित रामवाडी प्रिमीअर लीग ओव्हरआर्म क्रीकेट स्पर्धेच्या दुसर्या पर्वाचे रामवाडी चॅम्पियन्स संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत ड्रीम इलेव्हन आर्मी संघाने उपविजेतेपद तर स्वरा इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यास ७ हजार ७७७ रुपये व चषक तर उपविजेत्यास ५हजार ५५५ रु. व चषक, तृतीय क्रमाःकास ३हजार ३३३ रु. व च षक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील मालीकावीर आर्मी संघाचा तूषार जाधव, उत्कृष्ट फलंदाज चॅम्पियन्स सःघाचा संदेश रेवाळे, उत्कृष्ट गोलंदाज संदेश संतोष रेवाळे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुकेश हुमणे याःना चषक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेत रामवाडी चॅम्पियन्स ड्रीम ईलेव्हन आर्मी, स्वरा इलेव्हन, विनर्स रामवाडी, रामवाडी योद्धा आणी शिवनेरी वाॕरिअर्स हे संघ सहभेगी झाले होते.
बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी सरपंच सोनाली जाधव, उत्सव कमिटीचे अध्यक्ष नारायण बडबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.