संजय बच्छाव प्रतिनिधी, साक्री
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या महाराष्ट्रभर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवार रोजी साक्री तालुका भाजप तर्फे गौरव यात्रा काढण्यात आली. खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर वि. दा .सावरकर यांच्या स्मरणार्थ शहरात भाजप कार्यालयापासून सुरुवात झाली. शहरात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सावरकरांच्या नावाने विविध घोषणा देऊन "होय आम्ही सारे सावरकर"...! असे बॅनर शहरात झळकविण्यात आले.
गौरव यात्रेत डॉ. हिनाताई गावित, नगराध्यक्ष सौ जयश्रीताई पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री विजय ठाकरे ,श्री खंडू शेठ कुवर ,साहेबराव गांगुर्डे, उत्पल नांद्रे,विजय भोसले ,ऍड गजेंद्र भोसले ,नगरसेविका उज्वला भोसले ,मनीषा देसले ,सौ जयश्रीताई पगारिया ,उषा पवार ,भाजपा शहराध्यक्ष श्री विनोद कुमार पगारिया ,पिंपळनेर मंडळ अध्यक्ष श्री इंजिनियर मोहन सूर्यवंशी ,वेडू अण्णा सोनवणे ,प्रदीप नांद्रे ,श्री चंद्रकांत पवार ,जिल्हा सरचिटणीस श्री शैलेंद्र भाऊ अजगे ,श्री प्रवीण देसले ,रावसाहेब खैरनार ,दहिवेल भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी ,भाजपा किसान मोर्चा साक्री तालुका उपाध्यक्ष श्री संजय कालेश्वर बच्छाव ,ह भ प श्री रविंद्र महाराज. आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ,गौरव यात्रा उत्साहात पार पडली.