बागलाण तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाका



मालेगाव: अनिकेत मशिदकर 


           काल 8 एप्रिलच्या दुपारी साधारणतः चार वाजता अचानक ढगाळ वातावरण भरून आले त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. या पावसामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली, विजांच्या चारा तुटल्या, अनेक घरांचे छपरे पण उडाले. रावळगाव नाका व चर्चगेटच्या रस्त्याला अनेक झाडे पडली असताना अग्निशामकाच्या पथकाने रस्त्यावरील पडलेल्या झाडांना बाजूला केले. मालेगावातील अनेक भागात विज पुरवठा पण खंडित करण्यात आलेला होता. अनेक पिकांचेही नुकसान झाल्याचे कळत आहे. आधीच पिकांना भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदील झालेला असताना अवकाळीचे अस्मानी संकट शेतकऱ्यावर ओढावले आहे. 

        तिकडे नाशिक मधील बागलाण तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाका बसला आहे. अनेक झाडे रस्त्यावर पडली तसेच घराची,शाळेची व अनेक संस्थांची व आरोग्य केंद्रांची छप्परे उडाली. त्याचप्रमाणे विजेचे खांब व ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर पडलेले आहेत. गारांचा खच रस्त्यावर पडलेला दिसून येतो आहे. गाय व म्हैस यांचा मृत्यू झालेला आहे. शेतातील कांदा व सर्व पिके जमीनदोस्त झाल्याचे दिसून येते आहे. दोन दिवसांपासून या भागात पाऊस पडत असल्याने व गारपिट होत असल्याने आता या झालेल्या नुकसानाची सरकार कधी मदत करणार याकडे आस लावून शेतकरी बसले आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शेतकरी मागणी करत आहे व सरकारकडे लक्ष लागले आहे.