संस्काराने जीवन समृद्ध होते - डॉ.संजय मालपाणी



*संगमनेर : 

साधना करायची असेल तर थांबून चालणार नाही.संस्कारामुळे बालकाचे जीवन समृद्ध होते , असा मोलाचा संदेश गीता परिवारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.संजय मालपाणी यांनी दिला.गीता परिवार,शाखा संगमनेर आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.


       नुकतेच जाणता राजा मैदानावरील बालभवन येथे गीता परिवार आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले.या  शिबीराचे दिपप्रज्वलन श्री. संजयजी मालपाणी व संगमनेर शाखा अध्यक्ष श्री. संजय कर्पे यानी केले. शिबीरासाठी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री.संजय मालपाणी यांनी गीता पठनाचे व बालसंस्कार शिबीराचे महत्त्व विशद केले.गीता अध्ययनामुळे वाचिक अपंगत्व जाऊन वाणीस शुद्धता येते.शून्यरुप व्हायचे असेल तर वाकावेच लागते, अहंकार सोडावा लागतो.अहंकार सोडण्यासाठी बालकांवर माया करता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


   गीता परिवारच्या मार्गदर्शिका श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संस्कृत श्लोकांची संथा देऊन अनुपठन पद्धतीने पाठांतर करुन घेतले.कार्यकर्ते श्री.गिरीशजी डागा यांनी विविध गीते , पद्य चालीत हावभावासहित योग्य कसे म्हणावेत हे सांगितले.त्याचप्रमाणे हनुमान कथेच्या माध्यमातून बोधकथा कशी सांगावी याचे मार्गदर्शनही केले. स्नेहभोजनानंतर श्री .दत्ताभाऊ भांदुर्गे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून मनोरंजक खेळांचे प्रात्यक्षिक देखील करुन घेतले.याप्रसंगी विविध ठिकाणाहून शिबीरासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गिरीश डागा यांनी केले.प्रास्ताविक गीता परिवार शाखा संगमनेर चे अध्यक्ष श्री.संजय कर्पे यांनी केले तर आभार प्रदर्शन  कुदंन जेधे यांनी केले.सदर शिबीरासाठी कुंदन जेधे ,प्रमोद मेहेत्रे अभिजीत गाडेकर ,  भोलेश्वर गिरी, दर्शन जोशी, वैभव कुलकर्णी, कथले सर , सौ. शोभा बाहेती, सौ. सरोज असावा,सौ पुजा दिक्षीत यांसह  सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.