बीड दि. ६ (प्रतिनिधी):- शहरातील त्रिमुर्ती कॉलनी नं. २, दत्त नगर, के. एस. के. कॉलेज रोड बीड येथील रहिवाशी श्री. गोपीनाथ बाबुराव राऊत (वय ७६), हे दि. ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून घरातून बाहेर पडले आहेत. ते दि. ७ एप्रिल रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाहीत. नातेवाईक व मित्र परिवाराकडे चौकशी करुनही त्यांचा तपास लागू शकला नाही.
त्यांना गेल्या काही वर्षापासून स्मृतीभ्रंश हा आजार आहे. घरातील कोणत्याही सदस्याला काहीही न सांगता ते सकाळपासून घरातून बाहेर पडले ते उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यांना कोणी पाहिल्यास किंवा त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यास महेश राऊत मो.नं. ९४२३६१९३१९ आणि दुर्गेश राऊत - मो.नं.८३२९८५३००३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.