शेळगाव येथे क्रिडा प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबीर



 समाजरत्न महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे. के क्रीडा प्रबोधनी शेळगाव यांच्या विद्यमानाने खो-खो व मैदानी खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आज उद्घाटन झाले सदरचे शिबीर हे 10 दिवस चालणार आहे..

     यावेळी उमेश सुपुते यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना खेळायचे महत्व पटवून दिले,स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यात आत्मबल वाढवावे  असे मार्गदर्शन भीमराव जाधव सर यांनी केले..

   या क्रीडा प्रबोधिनी मधून मार्गदर्शन घेऊन गेलेले विद्यार्थी आज विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त करत आहेत, तर काही विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी आज प्रगती राजेंद्र चव्हाण या विद्यार्थिनीची ठाणे पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल व उमेश शिंदे { राष्ट्रीय खेळाडू} या विद्यार्थ्याचे पुणे ग्रामीण पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच शेळगाव गावचा सुपुत्र आणि प्रबोधिनीचा खेळाडू शंतनु राजेंद्र उचाळे याची चीन येथे होणाऱ्या { word university } स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे.

    तसेच सहभागी खेळाडूंना उन्हाळी शिबिरासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ जाधववस्ती { गौराई मळा } यांच्यावतीने मुंबई येथे कार्यरत असणारे सहाय्यक  पोलीस निरीक्षक श्री संतोष किरण जाधव यांनी 30 हजार रु किमतीचे किट खेळाडूंना दिले आहेत.आणि जुन्नर येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेमध्ये शेळगावच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल त्या संघातील खेळाडूंचा व या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून सन्मान मिळालेल्या जे .के क्रीडा प्रबोधिनी या प्रबोधिनीचे संस्थापक मार्गदर्शक कैलास जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

     या शिबिरात मुलांना गायन, वादन,चित्रकला,नृत्य,व्याख्यान,आहार मार्गदर्शन,करिअर मार्गदर्शन आशे विविध प्रकारचे मार्गदर्शन  मिळणार आहेत.     यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रगती राजेंद्र चव्हाण {ठाणे पोलीस} व उमेश दादाराम पारधे { Indian Army } प्रमुख उपस्थिती रामदास शिंगाडे { सरपंच }, राहुल जाधव  { कर्मयोगी कारखाना संचालक }, उमेश ननवरे {भैरवनाथ सोसायटी व्हा चेअरमन },  वैभव शिंगाडे {युवा नेते}, सुभाष दुधाळ  { प्रगतशील बागायतदार }, रमेश भाई पारधे, शुभम शिंगाडे, मनोहर जाधव,  महेश खराडे, संतोष जाधव सर,माळवे गुरुजी, भीमराव जाधव,रतन ननवरे,प्रशांत भुजबळ,वाघमारे सर, प्रदीप बोरकर, तसेच खेळाडू व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम मोहिते { गुरुजी } यांनी केले,तर आभार जे.की क्रीडा प्रबोधनीचे  संस्थापक मार्गदर्शक कैलास जाधव यांनी मानले.