बहिणीच्या स्मरणार्थ रेभोटा गावाला खुर्ची दान गाढे परिवाराचा स्तुत्य उपक्रम.



खिर्डी प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे

        दोन वर्षापुर्वी कोरोना काळात प्रणिता अरूण गाढे यांचा दुदैवी मृत्यू झाला नुकतेच लग्न होवून सुखी संसाराचे स्वप्न पहात असतांना प्रणिताला कोरोनाची लागन झाली खुप प्रयत्न करूनही उपचार करूनही ती वाचली नाही गाढे परिवाराची लाडाची प्रणिता हीचा दुदैवाने निधन झाले तीची आठवण कायम रहावी व गावासाठी काहीतरी देणे लाभावे यासाठी तीच्या द्वीतीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात रेभोटा गावासाठी सरपंच उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये गावाला विस खुर्ची दान करण्यात आली 

    प्रणिताचा भाऊ प्रजित अरुण गाढे यांनी दान दीले सरपंच पती आनंद सपकाळे . उप सरपंच पती सुनिल महाजन माजी सरपंच सुरेश शिवराम पाटील . विजय पाटील प्रविण धुंदले दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे प्रजीत अरुण गाढे . प्रतीक समाधान गाढे . प्रशिक समाधान गाढे . लता समाधान गाढे . प्रज्योत कांतीलाल गाढे . राहुल गाढे . अभियंता ज्ञानेश्वर गाढे . संजय गाढे छोटु गाढे संदेश गाढे . संपूर्ण गाढे परीवार उपस्थीत होते गाढे परिवाराने केलेल्या कार्याच सर्वत्र कौतुक होत आहे