डॉ . आंबेडकर यांच्या संविधानामुळेच भारताला मिळाली मजबूत लोकशाही



चांदा : भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना अतिशय मजबुत केली त्यामुळे १३५ कोटी लोकसंख्येच्या भारताची लोकशाही मजबुत राहिली हे जगातील देशांसाठी प्रेरणास्रोत आहे. बाबासाहेब ज्ञानयोगी होते. आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचा विचारांचा उर्जा स्त्रोत पुढे न्यावा, असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले.

    नेवासा तालुक्यातील चांदा येथील बसस्टॅडसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात सौ गडाख बोलत होत्या. सुरुवातीला सौ . गडाख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ आंबेडकरच्या पुतळ्याचे विधीवत पुजन करण्यात आले. उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना सौ गडाख यांनी बाबासाहेब आंबेडकर थोर ज्ञानयोगी होते. 

    आज चांदा गावातील युवकांनी एकत्रीत येत सुयोग्य पध्दतीने आंबेडकर जयंती साजरी करत आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचा केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे . यावेळी माजी सभापती कारभारी जावळे , गावच्या सरपंच सुनंदा दहातोंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


    कार्यक्रमासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजीराव दहातोंडे ,माजी जिप सदस्य अनिलराव अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी , माजी सरपंच संजय भगत , भाजपाचे कैलास दहातोडे, बाळासाहेब दहातोडे रावसाहेब दहातोंडे  ,चांगदेव दहातोंडे , रवि जावळे , संतोष गाढवे , बाळासाहेब जावळे, डॉ . सुधाकर निकाळजे ,बाबासाहेब आल्हाट ,चंदू जावळे , बाळासाहेब पुंड, नाथा जावळे, बशीर शेख,  सोमनाथ दहातोंडे , नामदेव धाडगे, , अमीत रासने, विजय रक्ताटे, , अशोक गाढवे, शरद गाढवे, सतीश गाढवे, जीवन आढाव, सुशांत गाढवे, अमोल अल्हाट, सागर अल्हाट, पप्पू दोंदे, मार्कस डोंगरे, सोनाजी साळवे, विजय घाडगे, राहुल कावळे, प्रकाश पंडित, अजिंक्य विधाटे, सतीश दोंदे, संदीप डोंगरे, अशोक दोंदे, बाबासाहेब आव्हाड आदी़ंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.