खेडमध्ये उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,  रत्नागिरी व ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून  फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर  दिनांक 14 ते 19 एप्रिल 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल , खेड येथे सकाळी 6:00  ते 9:00 या वेळेत संपन्न होत आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी शिवाजीयन्स संघाचे उत्कृष्ट खेळाडू प्रज्योत तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य राजकुमार मगदूम, ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलचे  प्राचार्य भरत मोरे  प्रशालेचे पर्यवेक्षक व प्रशिक्षक संतोष भोसले, मुकुंद सोमण, प्रथमेश रेवाळे, शिवम पाटणे , अनुज जोशी व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणास जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरीचे किरण बोरवडेकर व संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.