सूर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने जनता मेटाकूटीस आलेलो असतानाच शहरातील कासारआळी येथील सिद्धिविनायक संलातील रहिवाशा़ना गेले दोन महिने विकतच्या पाण्यावर आपली तहानभागवावी लागत आहे. गेले दोन महिने हे रहिवाशी न.प. दरबारी पाण्यासाठी टाहो फोडत असतानाहि सूस्त प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जर लवकरात लवकर हा पाणीपूरवठा सुरळीत नाहि झाला तर न.प. समोरच हंडा आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डाॕ. विलास शेळके यांनी दिला आहे.
गेले दोन वर्ष या विभागात वारंवार नळाला पाणि न येणे, आलेच तरी कमो दाबाने या प्रकाराने रहिवाशी हैरान झाले असून प्रशासनाला विनंती, निवेदन देवूनहि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे डाँ. शेळके यांनी दै.कर्णधारशी बोलताना सांगितले. करोडोंचा निधी उपलब्ध होत असतानाहि मूलभूत सुविधा देवू न शकणार्या येथील न.प. प्रशेसनाला हंडा आंदोलनाच्या माध्यमातूनच जाब विचारणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
आणाभाका घेवून निवडून आलेले येथील आजी, माजी नगरसेवकहि पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे कानाडोळा करत असल्याने अखेर दाद मागायची कोणाकडे असा यक्ष प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.