साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतील दहिते गटाचे वर्चस्व कायम


साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती काल 18 जागांसाठी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 93% मतदान झाले आहे तरी दोन्ही गटाच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी झाली. कालच सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली रात्री उशिरा 9 वाजता निकाल घोषित करण्यात आला

18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात असून शेतकरी विकास पॅनल व बळीराजा विकास पॅनल मध्ये चुरशीची लढत होती निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तर प्रशासनाच्या वतीने जोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात दोन्ही गटाच्या दिग्गज नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले होते. साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळाताई गावित भाजपाचे आबासो सुरेश रामराव पाटील विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिवाजीराव दहिते माजी खासदार बापूसाहेब चौरे व शिवसेनेचे विशाल देसले यांच्यात चुरस होती. दोन्ही गटामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असल्याने सत्ता कोणाच्या पारड्यात जाईन याच्याकडे सर्व तालुक्याचे लक्ष होते मात्र काल सायंकाळी उशिरा निकाल घोषित करण्यात आला तर त्यात विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांना जबरदस्त झटका बसला त्यांना फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले.

तर बापू सो शिवाजीराव दहिते यांच्या गटाने 18 पैकी 16 जागेवर दणदणीत विजय मिळवला . या निवडणुकीत जिभाऊ सो हर्षवर्धन दहिते यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. म्हणून विजयाचा मार्ग सुकर झाला .बापूसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जिभाऊंनी दहिते गटाचे वर्चस्व साक्री तालुक्यात कायम अबाधित  ठेवण्यात यश मिळविले. तर दुसरीकडे आमदार सौ मंजुळाताई गावित याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.