समनक जनता पार्टीच्या ऐतिहासीक लोकार्पण सोहळ्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे - प्रा. चव्हाण



रईस शेख सोयगाव 

    लोकशाहीच्या बळकटीसाठी, संविधान वाचविण्यासाठी समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्याला ९ नऊ एप्रिल रोजी माहूरगड येथे लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संपतभाऊ चव्हाण यांनी केले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महान तपस्वी योगानंद महाराज यांच्या हस्ते होणारा असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचे ड. अण्णाराव पाटील आहेत.


भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली असून भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या कुठल्याच राजकीय पक्षाने डल, डी, जलल ला न्याय दिला नाही, या लोकांवरील अन्याय अत्याचार वाढत असून या लोकांना न्याय मिळवून

देण्यासाठी उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळवण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी. लोकशाही बळकटीसाठी संविधान वाचवण्यासाठी समनक जनता पार्टीची स्थापना करण्यात आली असून, ९ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील माहुरगड येथे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा होणार आहेत. तरी या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला लाखोंच्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. चव्हाण यांनी केले आहे... प्रा. चव्हाण यांनी विस वर्षे सामाजिक संघटनेच्या मार्फत उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी लक्षनिक उपोषने रास्ता रोको आंदोलने, विराट मोर्चा, जेल भरो आंदोलने, अश्या विविध प्रकारचे आंदोलने करून लढा देत आसुन आता राजकारणात येण्याची घोषणा प्रा. चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी राजकीय पक्षाची

घोषणा केली असून, समनक जनता पार्टी या नव्या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे देखील चव्हाण यांनी म्हंटलेय आहे. या राजकीय पक्षामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या नव्या पक्षाचा प्रभाव आगामी निवडणुकीत निश्चितच दिसून येईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे... या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण कालापाड, अमरसिंग तीलावत, शब्बीर भाई अन्सारी, शंकर पवार, ड. शिवाजी खंकरे, नंदेश आंबाडकर, कल्याण दळे, दशरथ राऊत, दिनकर वाघमारे, सतीश कसबे, उमेश कोराम, मंगेश सोळंके, सुनील गोटखिंडे, आत्माराम जाधव, कांतीलाल नाईक, मोरसिंग राठोड, रुबीना पटेल. रविकांत राठोड, उल्हास राठोड या सह विविध मान्यवर उस्थितीत राहणार आहेत