सोयगाव प्रतिनिधी शेख रईस
सोयगाव : मराठवाडयात सध्या दुष्काळजण्य परिस्थीती असून जनावरांना चारा - पाणी व मजुरांचा हाताला काम नसल्यामुळे आणि शेतीत पडलेल्या नापिकी मुळे ग्रामिण भागात हात आखडता आसल्याने अनेक उदयोग धंदे चालकांचे कमंबरडे मोडले आहे . अशातच ग्रामिण भागात अवैध सावकारी व्यवसाय फोफावत असून अनेकांना या सावकारी व्यवसायाचा फास आवळला जात आहे .
मराठवाड्यात सध्या सर्वत्र दुष्काळ पडत असून पडणाऱ्या अत्य अल्प प्रजन्यवृष्टी मुळे निसर्गाचे चक्र कोलमाडले आहे . शेतात टाकलेला खर्च तर सोडाच पण मशागतीचे मोल सुध्दा निघत नसल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे . उलट या वर्षी तरी काळी आई भरभरून देईल या आशेवर जमिनीत दाणा - पाणी , खत टाकून सर्व सामान्य शेतकरी मोकळा होत होता पण अत्यल्प पडणारे पावसाचे पाणी आले तसे गेले यामुळे खान्देशात दुष्काळ निर्माण झाला . होते नव्हते ते पण गेले असा प्रकार काही वर्षापासून वारंवार घडत असल्याने बळीराजा संकटात सापडला त्यामुळे बाजार पेठेत आर्थिक उलाढाल मंदावली . यामुळे लहान मोठे उद्योग धंदे व्यावसायीक डबघाईला आले . त्यात उदयोजकांचा खर्च मात्र तसाच सुरू असल्यामुळे अनेक पानटपरी धारक , हॉटेल धारक , किराणा दुकानदार , यासह अनेक लहान मोठे उद्योग धोक्यात आले . इमारत भाडे , लाईट बील , मजुरांचा पगार , व इतर खर्च पहाता उदयोग मालकाला डोईजड झालेत.
पण बेकार फिरून करणार काय ? असे म्हणून वेळप्रसंगी सर्व आर्थिक फंडे वापरूनही दमलेल्या अशा उद्योजकांना खाजगी सावकाराची मनधरणी करावी लागते . अशाच परिस्थीतीचा फायदा घेत अवैध सावकारी करणारे इसम विना परवाना _ बेकायदेशीर पणे आपले उद्योग जोमात सुरू केले आहे . शेकडा ५ ते १० रूपये प्रतिमाह प्रमाणे ही रक्कम बिनबोभाट पणे देवाण - घेवाण सुरू आहे . असे व्यवाहार करण्यापूर्वी हा व्यवाहार गोपानिय ठेवण्याच्या अटीवरच केला जातो . " तुला गरज असेल तर घे मी काही सावकारी करत नाही पण तुझी गरज म्हणून देतो व इतके टक्के पडतील " असे कुणाला सांगितल्यास पैसे मिळणार नाही असे प्रथमच बजावले जाते व मी आपणास उसनवारी करत आहे असे भासवले जाते . आणि महिन्याकाठी व्याज वसुली सुरू होते . मुद्दल मात्र तसेच रहातात हा व्यवहार बिनभोभाट सुरू रहातो . वर्षानुवर्ष या व्याज चक्राबाहेर पडणे अनेकांना शक्य होत नाही . त्यामुळे आत्महात्या घडतात पण याची कुठे नोंद नसल्यामुळे वाच्यता होते नाही . हे सत्य आहे . या अशा अनेक गावात सुरू असलेल्या छोट्या _ मोठया सावकाराची नोंद कुठे नसते त्यामुळे अनेकांवर कार्यवाही होणे दुरच पण साथी चौकशी होत नाही .
अशा अवैध सावकारी करणाऱ्या इसमांचे जाळे आता वाढत असून दुष्काळ हे त्याला मुख्य कारण आहे . शेती , बैलजोडी , चिज वस्ता , घर ,जमिन गहाण ठेवून असे व्यवाहार केले जातात तर काही जणांनकडून बॅक धनादेश कोरे ज्यावर रक्कम न लिहीता वेळेवर रक्कम लिहुन बॅकेत टाकून पैसे काढता येईल व पैसे न मिळाल्यास धनादेश अनादर प्रकरणी दावा दाखल करता येईल अशी व्यवस्था प्रथमच करून ठेवली असल्याने कर्जदार मुकाट पणे व्याज - व्याज दरमहा फेडत असतो . ग्रामिण भागात असे अनेक प्रकार घडत आहे . त्यामुळे या अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्ती कार्यवाही पासून दुर असतात . असाच काहीसा प्रकार ग्रामिण भागात जोरात सुरू असून गुन्हे शाखेने माहिती देणाराचे नाव गोपनिय ठेवून अशा अवैध सावकारांची माहिती जमा करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी पुढे येत आहे .