सूर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
एचडीएफसी लाईफ इन्सुरन्स या कंपनीकडून स्वच्छ भारत मिशन या नावाखाली शाळानिहाय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करून त्या नावाखाली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकण्याचा डाव भरणे येथील काही सुज्ञ नागरिकांनी आज हाणून पाडला.
एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कडून खेड शहरातील काही खासगी शाळांमध्ये स्वच्छ भारत मिशन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दाखविण्यात आले. त्या उपक्रमातंर्गंत विद्यार्थ्यांनी आपल्या नावासह मोबाईल क्रमांक भरून देण्याचे सुचित केले होते. त्यानुसार या प्रश्नमंजुषा उपक्रमाच्या नावाखाली एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कडून तातडीने भरणे येथील एका आलिशान हॉटेल मध्ये इन्शुसन्स पॉलिसी विकण्याचा कार्यक्रम बिनभोबांटपणे हाती घेऊन विद्यार्थ्याच्या पालकांना तुमचा मुलगा स्वच्छ भारत मिशन मध्ये यशस्वीरित्या उर्तीर्ण झाला आहे. त्याचे पारितोषिक घेण्यासाठी उपस्थित रहा. आपण उपस्थित राहील्यास त्याठिकाणी आणखी एक पारितोषिक आपली वाट पाहत आहे. असे आमिष दाखवून त्या आमिषा पोटी पालक आपल्या पाल्याला घेऊन समंधीत आलिशान हॉटेलच्या प्रांगणात आपल्या पाल्याला घेऊन ताटकळत बसले होते. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही सुज्ञ पालकांना खरा प्रकार निदर्शनास आला. स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली उपक्रम राबवून त्या खाली पॉलिसी विकण्याचा गोरखधंदा असल्याचे उघड झाल्याने काही सुज्ञ पालकांनी एचडीएफसीच्या अधिकार्यांना विचारणा केली. त्यावर अधिकार्याकडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने भरणे गावचे सरपंच संतोष खेराडे, उपसरपंच राजेश मोरे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनीधींना पाचारण केले. प्रसार माध्यमाचे प्रतिनीधी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी देखील प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांना देखील समर्पक उत्तरे देता आली नाही. अखेर त्या अधिकार्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे मान्य करून विमा विकत असल्याचे सांगितले.
एचडीएफसीच्या एका कर्मचार्यांने चक्क एका शाळेच्या शिक्षकाला फोन करून तुमच्या पाल्याला बक्षीस लागले आहे. असे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर आलीशान हॉटेल मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कर्मचार्यांनी त्या ठिकाणी लावलेले फलक गुंडाळून त्या हॉलमधून काढता पाय घेतला. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका नामांकीत शाळेच्या समन्वयकाने फोन चा बहाणा करित तेथून पळ काढत घर गाठणे पसंत केले.
दरम्यान, खासगी शाळांनी पालक व विद्यार्थी यांची माहिती अन्य बॅका, सामाजिक संस्था यांना परस्पर देणे ही चुकीची व गंभीर बाब आहे. यातून विद्यार्थी व पालक यांचे नुकसान होईल. या ठिकाणी येथील एका खासगी शाळेचा समन्वयकच अशा बॅकांच्या अधिकार्यांना मदत करत असेल तर विद्यार्थी आणि पालकांचे भविष्यातील नुकसान न भरून निघणारे आहे.