प्रतिनिधी-- श्री दिपक पवार
संभाजीनगर तालुक्यातील शिक्षक सेना मुख्य शाखा व महिला आघाडी दोन्ही बाजूंनी कार्यप्रभावाने वृद्धीस लागली आहे.शिक्षकसेना संभाजीनगरच्या कार्याच्या झंजावाताने शिक्षकसेना तालुका शाखा व महिला आघाडीत मोठ्या संख्येने नव्याने प्रवेश होऊ लागले आहेत.
आज शाळा तिथे शिक्षकसैनिक अभियानाचा शुभारंभ कृतिशील विचारांचे जि.प.प्रा.शा. धर्मपुरचे मुख्याध्यापक श्री.प्रदीप निकम सर व प्रा.शा.करोडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय सांगळे सर तसेच,रणरागिनी श्रीम.अंबिका परमेश्वर गुडेटवार मॅडम यांचा जिल्हा संघटक श्री.रवी जाधव सर यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक सेनेत जाहीर प्रवेश घेऊन झाला.लवकरच शिक्षक सेनेत जाहीर प्रवेश घेतलेल्या या शिक्षक सैनिकांना जिल्हाध्यक्ष श्री.दिपकदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येईल.
यावेळी शिक्षक सेना तालुकाप्रमुख सचिन वाघ, महिला आघाडी प्रमुख विद्या सोनोने जिल्हा संघटक श्री.रवी जाधव सर महिला आघाडी ता.उपाध्यक्ष श्रीम.हेमलता जाधवश्रीम.रिटा मार्कंडे व इतर शिक्षक सैनिक यांनी नवप्रवेशित बंधू व भगिनी यांचे शुभेच्छा देऊन स्वागत केले.