सतीश कोळी खुलताबाद शहर प्रतिनिधी
दि.२० एप्रिल २०२३
आज दि.२०/०४/२०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कन्नड या केंद्रात प्रशाला कन्नड येथे गटशिक्षणाधिकारी श्री. शेषराव गंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण प्रशाला कन्नड येथे उत्साहात घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. दिनेश दाभाडे सर व श्रीम. पुजा मिसर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री.दिलीप गायकवाड सरांनी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे यश व अनुभव सांगून उत्साह वाढवला. तालुक्यातील साधनव्यक्ती शेख मँडम प्रशिक्षणात उपस्थित होते.
सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व सर्व अंगणवाडी सेविका यांची १०० % उपस्थिती होती. सदर प्रशिक्षणात सुरूवातीला शाळापूर्व तयारी निमित्त दिलेल्या सात निकषांवर आधारित नवीन पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांची शाळापूर्व तयारी कृतियुक्त सहभागातून कशी घ्यावी हे प्रत्यक्ष सादरीकरणातून सादर करण्यात आले व सर्व शाळांना शाळास्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा घेण्याचे सुचित करण्यात आले. शेवटी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश कोळी सरांनी सर्वांचे आभार मानले.