इगतपूरी -----दिनांक 19 एप्रिल 2023 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाळविहीर येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमाच्या वेळेस वैतरणा केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री नांदुरकर सर उपस्थित होते तसेच शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दल भाषणामध्ये मनोगत व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट असा जेवणाची मेजवानी दिली गेली. इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक श्री गोकुळ अहिरे सर यांनी मनोगत व्यक्त करताना वाळ विहीर शाळेची यशोगाथा व्यक्त केली तसेच वैतरणा केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री नांदुरकर सर यांनी आपल्या भाषणामध्ये वाळविहीर शाळेबद्दल प्रशंसा केली.सर्व शिक्षकांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामानिमित्त कौतुक केले अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी केली.
वाळविहिर शाळेच्या मुलांना दिला निरोप
April 20, 2023