नांदगाव - प्रतिनिधी ( मुक्ताराम बागुल ) :-
नांदगाव कलाशिक्षक संघातील विविध मागण्यासाठी दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सोमवारी नांदगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्राथमिक, व शासकीय, खाजगी आश्रम शाळांमध्ये कायमस्वरूपीय एका कला शिक्षकाची भरती व्हावी. राज्यातील अनेक कला शिक्षकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आश्रम शाळा खाजगी शासनमान्य अनुदान, विनाअनुदानित शाळेत कंत्राटी पद्धतीने अंशकालीन निर्देशक तसेच शासनमान्य पूर्ण अनुदानित शाळेत फिक्स पे काम करणारे कला शिक्षकांना प्राधान्य प्रमाणे कायमशेवेत घेण्यात यावे. त्यांना वेतन व भत्त्याचा लाभ मिळावा. सेवानिवृत्त कला शिक्षकांच्या जागी कला शिक्षकांची भरती व्हावी. अशा मागण्यासाठी महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने कला शिक्षक महासंघातर्फे नांदगाव तहसील कार्यालयाची नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाच्या वेळी कलाशिक्षक महासंघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संजय बोरसे, नांदगाव तालुका अध्यक्ष सुनील वाघ, सचिव दत्तात्रय बागुल, संदीप पाटील आदी कलाशिक्षक उपस्थित होते.