प्राध्यापकाला मारहाण; गुन्हा दाखल

 


मलकापूर : मुली शिक्षकासोबत दिसल्याने शहरातील पारपेठमधील नागरिकांनी शिक्षकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी सय्यद मोसिन सय्यद अझम याच्यासह सात अज्ञात आरोपीविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..शहरातील प्रा. गौतम देविदास मेहत्रे सोमवारी दोन विद्यार्थिनींसोबत चर्चा करण्यासाठी जात होते. यावेळी पारपेठ भागातील काही लोक अचानक आले. मुलीसोबत काय करीत आहात, अशी विचारणा त्यांनी केली.

यावेळी सय्यद मोसिन सय्यद अझम याच्यासह सात जणांनी मिळून मेहत्रे यांना चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच - १९, एपी - १३७२) बुलढाणा रोड येथून पारपेठ पिलू तकिया येथे नेले. तेथे मारहाण केली.माहिती मिळताच मलकापूरपोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमीला उपचारासाठी बुलडाणा येथे पाठवण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाये करीत आहेत. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.