नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ओळखपत्राचा गोंधळ समोर आला होता. त्यानंतर आता राज्य सामायिक परीक्षा म्हणजे सीईटी सेलने नवीन गोंधळ केला आहे.बी.एड. अभ्यासक्रमासाठी सध्या सीईटी सेलकडून प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये बुधवार २६ एप्रिलच्या तारीख देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र हा पेपर कालच झाला असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला असून सीईटी सेलच्या चुकीने वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.