तालुक्यातील पातोंडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती संघर्ष क्रीडा मंडळ च्या वतीने 20 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पातोंडा सरपंच सौ रजनीताई सुभाष घुळे, उपसरपंच गयाबाई सिताराम नेमाडे, जिल्हा पुनर्वसन समिती सदस्य तथा माजी सरपंच पुरुषोत्तम झाल्टे,जळगाव जामोद येथील रणित सर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावाच्या सर्व प्रमुख मार्गावर शोभेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यामध्ये नारायण झाल्टे, यशवंत पाचपोर, रामदास सपकाळ, इतर गावातील मंडळी शोभा यात्रेत सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांना सहभागी झाले. सुभाषराव घुळे त्यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच नारायण झालटे यांच्यावतीने लिंबू सरबत देण्यात आली. यावेळी भव्य महाप्रसादाने सादर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ रजनी सुभाष घुळे. उपसरपंच गयाबाई नेमाडे, ग्रामपंचायत सदस्य शुद्धोधन रणित, यशवंत पाचपोर, राहुल रणित, एकनाथ झाल्टे, पोलीस पाटील अशोक पाटील, भागवत नेमाडे ,गजानन काळे रोशन झाल्टे, दत्ता गायगोळ,रामदास सपकाळ ,कपिल सिरसाठ ,देवानंद रणित ,दिनकर रणित , सुनील रणित, संदीप रणित, मोहन रणित, भास्कर वाकोडे, मधुकर वाकोडे, प्रकाश वाकोडे, निवृत्ती रणित, किरण तेलंग, उमेश रणित, भीमराव रणित, ईश्वर रणित तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांच्यासह पदाधिकारी ,सदस्य , कार्यकर्ते व बहुसंख्य समाज बांधव मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी झाले होते पातोंडा नगरी दुमदुमून गेली होती, यावेळी एमपीसी दीपक सोळंके व इंगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला