सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
खेड-बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.ए केजी एण्ड प्रायमरी व एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवार दि.२६ एप्रिल २०२३ रोजी ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन ए.ई.कालसेकर कॅम्पसमध्ये मा.संस्थाध्यक्ष श्री.ए.आर.डी खतीब सरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
सुमैया मोटलेकरच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिफा ठाकूरने नातपाक तर उल्फत एण्ड ग्रुपने स्वागत गीत सादर केले. प्रशालेचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना पाहुण्यांचा परिचय करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मौलाना अखतर सुल्तान, मौलाना वजिहुद्दीन परकार आणि हसनमिया रिफाई सरांनी रमजान तसेच ईदेचे महत्त्व व्यक्त केले.
प्रमुख वक्ते प्राध्यापक अब्दल्लाह इस्माईल मुल्ला सरांनी सत्याचे महत्त्व सांगताना ईश्वराची आठवण करून मानव जातीच्या कल्याणासाठी सदैव कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना मोहिमतुले आणि सनोबर काणेकर यांनी तर आभार प्रदर्शन रुबीना कडवईकर केले होते. याप्रसंगी सर्व संस्थासदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य ला