अध्यक्ष पदी दिवाकर प्रभू तर सचिव पदी मंदार आपटे
सूर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
तालुक्यातील विशेषतः ग्रामीण वार्ताहरांनी एकत्र येत खेड तालुका स्वाभिमान पत्रकार संघाची स्थापना केली. अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू यांची तर सचिवपदी मंदार आपटे यांची निवड करण्यात आली.
तालुक्यातील वार्ताहार एकत्र येऊन बुधवारी शासकीय विश्राम गृह येथे बैठक सकाळी ११:०० वाजता पार पाडली. यावेळी अनेक वार्ताहार उपस्थित होते . वार्ताहार बंधूनवर जो अन्याय होतो त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी हा संघ कार्यरत राहील. लवकरच उर्वरित कार्यकारणी जाहीर करू असे अध्यश प्रभू यांनी सांगितले.
नूतन अध्यश दिवाकर प्रभू व सचिव मंदार आपटे यांचे येथील सर्वच स्तरावरुन अभिनंदन करण्यात आले.