शेळगाव मध्ये महामानवांना मानवंदना

 


शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय तसेच बुद्ध विहार व गौराई वस्ती या ठिकाणी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती पार पडली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येकाने घराघरांमध्ये पोचवले पाहिजेत ही काळाची गरज आहे आणि हे कार्य जर आपण प्रमाणिकपणे केले तर खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न झाल्यासारखे आहे.

 या जयंतीच्या कार्यक्रमासाठी शेळगाव ग्रामपंचायत चे  सरपंच रामदास आप्पा शिंगाडे तसेच ग्रामसेवक  दत्तात्रय इनामे, कर्मयोगी चे संचालक अंबादास शिंगाडे, राहुल जाधव  वालचंद नगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पाटील साहेब , ऍड अक्षय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शुभम शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव,  मुख्याध्यापक उमेश सुपुते सर,ईश्वर शिंगाडे महेश खराडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी  व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते