सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ठाकरे गटाचे खेड-मंडणगड-दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह त्यांच्या २० कार्यकर्त्यावर येथिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी दाखल केली आहे.
बुधवारी येथील पंचायत समिती सभागृहात जलजीवन मिशन अंतर्गत अधिकारी व ठेकेदार यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी आमदार संजय कदम यांना व्यासपिठावर बसविल्याने ठाकरे-शिंदे गटात जोरदार बाचाबाची झाली होती, याचाच राग मनात धरुन संजय कदम आणी कार्यकर्त्यानी लाठ्या-काठ्यांसह पाठलाग करत आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच संजय कदम यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचे श्री. धाडवे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, कदम आणी सहकार्यावर भा.दं.वि. कलम १४३,१४४, १४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत. दरम्यान कायदा सुव्यवस्था अबादीत राहत कोणताहि अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यःत्रणास सतर्क झाली असली तरी तालुक्यात वातावरण तापले असल्याचे बोलले जात आहे.