सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडची कार्यकारणी सभा नुकतीच तालुका अध्यक्ष श्री.शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. शाळा खेड नं.१ येथे संपन्न झाली. पुरोगामी शिक्षक समिती व प्राथमिक शिक्षक समिती यांच्या विलीनीकरणानंतर तालुक्यात झालेली ही पहिली कार्यकारणी सभा होती. या सभेसाठी प्राथमिक शिक्षक पतपेढी विद्यमान संचालक, तथा ज्येष्ठ शिक्षक मार्गदर्शक श्री. बळीराम मोरे,श्री.दिलीप महाडिक, श्री.रुपेश जाधव, श्री.जगदीश कांबळे, श्री.अरविंद वारे,श्री.दीपक कारंडे उपस्थित होते.
या सभेत प्राथमिक शिक्षक समितीत आलेल्या सर्व सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. यानंतर काळाची पाऊले उचलून घ्यावयाचे संघटनेबाबत धोरणात्मक निर्णय व संघटनेची भविष्यातील वाटचाल याबाबत श्री. बळीराम मोरे व प्रशासनाशी लढा देताना संघटनात्मक करावयाची कार्यवाही व संघटना एकीकरणाची गरज याबाबत श्री.दिलीप महाडिक, तर पुढील संघटनात्मक कामकाज एक दिलाने चालवत खेड तालुक्याला समितीचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री. रुपेश जाधव यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.
सभेत इतिवृत्त व जमा खर्च वाचनानंतर राज्य महाअधिवेशन पावती पुस्तके, मागील सभासद पावती पुस्तके यांचा आढावा घेण्यात आला. यानंतर शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशनाच्या पूर्वी सभासद नोंदणी करणे आवश्यक असल्याने सन२०२३ ची सभासद पावती पुस्तके वाटप प्रभाग निहाय करण्यात आले. तसेच सर्व सभासद बंधू भगिनी यांनी आपल्या प्रभागातील सभासदांची जास्तीत जास्त नोंदणी करून सभासद नोंदणी सहकार्य करून सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष श्री. शरद भोसले यांनी केले.
यावेळी जि.प.शिक्षण समिती रत्नागिरी माजी निमंत्रित सदस्य श्री.सुनील दळवी, शिक्षक पतपेढी तज्ज्ञ संचालक श्री. संजय सुर्वे, श्री.संतोष चव्हाण, श्री.संतोष तांबट, श्री.दिनेश पवार, श्री.भरत बोडके श्री.समाधान सरोदे यांचे तालुका संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शिक्षक समिती परिवारात स्वागत करण्यात आले.
सभेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अजित भोसले, ज्येष्ठ जिल्हा सल्लागार श्री.परशुराम पेवेकर, तालुका सचिव श्री.अशोक आकुसकर, उपाध्यक्ष श्री. बबन साळवी, श्री.अनिल यादव, कोषाध्यक्ष श्री.नरेश ठोंबरे, प्रसिद्धी प्रमुख श्री. दिलीप यादव, संघटना प्रवक्ते श्री.नेत्रदीप तांबे, सहसचिव श्री.धर्मपाल तांबे, श्री शंकर लोखंडे, डी.सी.पी.एस. जिल्हा प्रतिनिधी श्री.ईश्वर तागड, कार्यालयीन चिटणीस श्री. अर्जुन गावीत, माजी कार्यालयीन चिटणीस श्री.नारायण शिरकर, लोटे विभाग प्रमुख श्री.संतोष बर्वे, श्री.राजाराम फावरे, श्री.भागोजी कडव, श्री. तुकाराम काताळे, श्री नवनीत घडशी, श्री. श्रीकृष्ण खांडेकर, श्री. सुभाष महाडिक, श्री.दिपक कांबळे आदी सभासद उपस्थित होते.
शेवटी सचिव श्री. अशोक आकुसकर यांनी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.