उदगीर - प्रतिनिधी
किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ.अरविंद नवले यांची निवड करण्यात आली. डॉ नवले यांच्या निवडीचे पत्र किसान शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे ,कोषाध्यक्ष नामदेव चामले, सदस्य विशाल पाटील, सदस्य पृथ्वीराज पाटील, माजी प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, सी व्ही सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी दिले. डॉ नवले यांनी यापूर्वी महाविद्यालयात न्याक व आयसीक्युचे समन्वयक ,एनसीसी चे कॅप्टन, इंग्रजी विभाग प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सिनेट मेंबर, सदस्य इंग्रजी अभ्यास मंडळ ,विषय तज्ज्ञ, कुलगुरू प्रतिनिधी ,अनेक विद्यापीठाएम फील, पीएचडी चे रेफरी अशा विविध विभागावर उल्लेखनीय कार्य केलेले आहे.त्यांचे 49 पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. 80 च्या वर त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मधून व्याख्याने दिलेली आहेत .त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.