मुकेश निरुणे - उदगीर
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसीएशन अंतर्गत लातूर टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या वतीने 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठीक 10 वा. क्रीडा संकुल, उदगीर येथे होणार आहे.
लातुर जिल्हा अंडर 23 वर्षातील पुरुष व महिला संघाची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा यासाठी निवड चाचणी आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याचा संघ सहभागी होत आहे. यासाठी 20 एप्रिल 2023 शनिवारी सकाळी ठीक 10:00 वा. टेनिस क्रिकेट खेळाडूंनी आपल्या स्वतःच्या किटसह या निवड चाचणी साठी उपस्थित राहावे. खेळाडूंचा जन्म ई. स. 2000 च्या नंतरचा असावा. जन्म पुराव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यामध्ये इंग्रजी व मराठी मध्ये असलेला किंवा एस. एस. सी. बोर्डाचे जन्म तारखेची नोंद असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड ग्रा. पंचायत किंवा नगरपालिका यांचे जन्म प्रमाणपत्र ई. ग्राह्य धरण्यात येईल. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
राज्यस्तरीय पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा 24 ते 27 एप्रिल २०२३ दरम्यान महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे संपन्न संपन्न होणार आहेत. तरी अंडर 23 वर्षाखालील खेळाडूंनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा. नाव नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीची अंतिम तारीख 19 एप्रिल आहे. या नंतर येणाऱ्या खेळाडूंचा कसलाही विचार केला जाणार नाही..
नोट : निवडीमध्ये 2 क्षेत्ररक्षक, 4 फलंदाज, 4 ऑल राऊंडर आणी 6 गोलंदाज अशा 16 खेळाडूंची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क: अमोल मोरे 9623320548 शिवकुमार कोळ्ळे 8669043705. खेळाडूंनी वरील मोबाईल वर फोन करुन नोंद करावी व खेळासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक समितीने केले आहे.