सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
शहर आणी खाडीपट्टा विभागाला जोडणार्या नारिंगी नदीवरील देवणे पूल ते साठी मोहल्ला हा रस्ता ३० दिवसांच्याआत उखडला असल्याने या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड होत आहे. दरम्यान, वाहनचालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आसल्याने संबधित ठेकेदाराची खातेनिहाय चौकशी करत त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
हा रस्ता येथील नगर परिषदेच्या हद्दीत येत असून प्रशासनाचा ढिसाळ कामकाज दिवसेंदिवस समोर येत आहे. हा मार्ग खाडीपटूयातील गावांना जोडणारा असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी ये-जा असते. एक माहिन्यापुर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अंदाजपत्रकाप्रमाणे खडी व डांबर यांचे प्रमाण वापरण्यात आले नसल्याचे दिसून येते. या मुळेच केवळ ३० दिवसांच्याआतच हा रस्ता उखडला आहे.
हा रस्ता जगबुडी नदिच्या काठावरुन जातो तसेच हा भाग पुरग्रस्त भाग असल्याने येत्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे वाहून जाणार आसल्याचे चित्र आहे. पूराने रस्ता वाहून गेला तरी त्याची कोणतीहि चौकशी होत नाहि आतिवृष्टीच कारण देण्यात येत हे माहिती आसल्यानेच डांबरीकरण जाणिवपूर्वक निकृष्ट करण्यात आले असल्याचे वाहनचालकांकडून बोलले जात आहे. आधी देवणे पूल मग जोड रस्ता याःना निकृष्टतेच ग्रहण लागलेल असताच न.प. हद्दीतील हा रस्ता भ्रष्टाचाराच्या चिखलात माखल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या मूळे या कामाची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागाणी जोर धरत आहे