होळकर कुटुंबीयांचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार
प्रतिनिधी / गणेश ठाकरे निफाड :
केजीएस शुगर कारखान्याने आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्वीच्या कारखाना व्यवस्थापनाकडून थकीत असलेल्या ऊस बिलांची रक्कम शेतकऱ्यांना चेकद्वारे अदा केली. चेअरमन संजय होळकर यांच्या पुढाकारातून होळकर कुटुंबीयांनी नैतिक मूल्यांची जपणूक करत शेतकरी बांधवांना आर्थिक संकटाच्या काळात दिलासा देण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी एनसीएलटीकडून प्राप्त झालेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांची थकीत देणी अदा करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांनी फॉर्म बी भरला नसल्यामुळे त्यांना यापूर्वी पेमेंट मिळू शकले नव्हते. वस्तुतः या थकबाकीची जबाबदारी सध्याच्या व्यवस्थापनावर नसतानाही सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी देण्याचा निर्णय होळकर कुटुंबीयांनी घेतला.
यावेळी बोलताना कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, हा कारखाना केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने विकत घेतलेला नाही. कर्मवीर चांगदेव पाटील होळकर आणि त्यांचे सहकारी कर्मवीर प्रल्हाद पाटील कराड यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच निफाड तालुक्यातील साखर कारखाने बंद पडल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली परवड थांबवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी श्री. मंगरूळ साहेब, तहसीलदार विशाल नाईकवाडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री. आव्हाड साहेब यांचीं प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे केजीएसलाच ऊस देण्याचा निर्धार!
आव्हाड साहेब, प्रभाकर रायते, बाळनाथ शिंदे, रामदास शिंदे, संचालिका सोनिया होळकर, किशोर होळकर, कार्यकारी संचालक आदित्य होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रकाश दायमा यांनी केले, तर कार्यकारी संचालक आदित्य होळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
