मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे उत्साहात संपन्न

 



प्रतिनिधी = गणेश ठाकरे,लासलगाव 

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या सचिवालयांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालये मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. संदीप सूर्यवंशी आणि ग्रामीण रुग्णालय, लासलगावचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. बाळकृष्ण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले.

रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. लतीफ तांबोळी व श्री. बबनभाऊ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. डॉ. स्वप्निल पाटील, सहाय्यक अधीक्षक मा. पठाण, इन्चार्ज सिस्टर श्रीमती ऐश्वर्या महाजन, श्रीमती लाड मॅडम तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मा. डॉ. बाळकृष्ण अहिरे यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देत ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सेवांविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच Palliative Care योजनेद्वारे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली.

मा. डॉ. स्वप्निल पाटील यांनी मानसिक आरोग्य व असंसर्गजन्य आजार (NCD) याबाबत समुपदेशन केले. श्री. बबनभाऊ शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

शिबिरामध्ये देण्यात आलेल्या सेवा

• रक्तदाब व मधुमेह तपासणी

• ईसीजी (ECG)

• एक्स-रे

• मौखिक आरोग्य तपासणी

• NCD स्क्रीनिंग

• बालरोग तपासणी

• Palliative Care सेवा

• किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन (HB) तपासणी

• विविध रक्त तपासण्या

• नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी

• आयुष्मान (MJPJAY) व आभा कार्ड नोंदणी

शिबिराचा अहवाल

एकूण रुग्ण : १९४

ECG : २४

X-Ray : ३७

NCD तपासणी : ११२

रक्त तपासणी : ९४

HB तपासणी : ५२

आभा कार्ड : २६

आयुष्मान (MJPJAY) कार्ड : ३४

शिबिरात सर्व प्रकारची दर्जेदार औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच हिंद लॅब, NCD पथक, RKSK, केस पेपर विभाग, ब्लड बँक विभाग आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी केले