सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निबंब ने आग आटोक्यात आणण्यात यश...
प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव
लासलगाव जवळील सोहम नगर येथील रहिवासी शंकर खैरे पत्र्याचे घरात उष्णते मुळे गॅस सिलेंडरचा स्पोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत पत्र्याच्या घरासह घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने घरातील पाच जण थोडक्यात बचावले आहेत.
उन्हाच्या प्रचंड उकाड्यामुळे घरातील माणसे घराबाहेर झाडाखाली बसले असल्याने मोठी जीवितहानी हानी टळली. स्फोटाचा आवाज इतका भयंकर झाला की परिसरात दूरवर ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्फोट इतका तीव्र होता की घरातील भांडी, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे परिसरातील काही झाडेही जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निबंबचे सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे सोहन नगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लासलगाव येथील सोहम नगर मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना माहीत झाल्यानंतर तत्काळ सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाचा अग्निबंब त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले..
लासलगाव कर व परिसरातील गावातील अग्नीचे संकट दूर करण्यासाठी आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मंडळाने महिंद्र ट्रॅक्टर मंडळात समाविष्ट करण्यात आलेला आहे. --श्री.विशाल पालवे, लासलगाव
