सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; देवगाव परिसरात हळहळ

 



प्रतिनिधी  :-गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील देवगाव येथील महादेवनगर परिसरात सर्पदंश झाल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि.०७ एप्रिल रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणारे साई प्रशांत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील प्रशांत एलजी सोनवणे, वय ५३ वर्षे, रा. महादेवनगर, देवगाव हे आज सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास शेतात गवत कापत असताना त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ सर्पदंश झाला.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे सकाळी ११ वाजता दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल राठोड यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस अकस्मात मृत्यू नोंद क्र. २३/२०२६, भारतीय नागरी सुरक्षा कायदा २०२३ चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि. दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Tags