कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात गहू दिन, शिवार फेरी व शेतकरी मेळावा संपन्न

 



प्रतिनिधी. -गणेश ठाकरे, लासलगाव 

कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कुलगुरू मा.डॉ.विलास खर्चे व संशोधन संचालक मा.डॉ.प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली 'गहू दिन' कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

     गहू दिनाच्या निमित्ताने प्रक्षेत्रावर विविध गहू वाण, संशोधन प्रयोग, प्रात्यक्षिके तसेच बीजोत्पादन यांचे प्रदर्शन करण्यात आले. शिवार फेरीचे उद्घाटन संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बोडके यांनी, शेतीमध्ये विकसित झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. संशोधन केंद्राने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विकसित केलेल्या गहू वाणांची लागवड केल्यास उत्पादनवाढीस निश्चित मदत होईल. ‘फुले समाधान’ हा वाण शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला असून शेतकरी त्याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. तसेच कमी पाण्यावर येणारा व चपातीसाठी उपयुक्त ‘फुले अनुपम’, करपा रोगास प्रतिकारक ‘फुले अनुराग’, उच्च पोषणमूल्य असलेला ‘फुले संपन्न’ तसेच बिस्किटासाठी उपयुक्त ‘फुले सात्विक’ या वाणांची निर्मिती करून संशोधन केंद्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे सांगितले.

       या कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार तसेच कृषी महाविद्यालय, धुळे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ.इल्हे, डॉ.हेमंत पाटील, सहयोगी संशोधन संचालक, इगतपुरी व डॉ.आर.व्ही.पाटील, प्रमुख, द्राक्ष व कांदा संशोधन केंद्र पिंपळगाव ब., डॉ.सचिन हिरे, प्रमुख डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि विद्यावेत्ता प्रा.संजय चितोडकर, गहू पैदासकार डॉ.निलेश मगर, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ.भरत मालुंजकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक बाळू झडे, राजेश लोखंडे, राजेंद्र भदाणे, संजय वाघ, चंद्रकांत बेलदार, विजय पाटील, अनिल पाटील, संदीप रावते, रविंद्र गांगुर्डे, सौ.गावित, सौ.बहिरम, सौ.पवार, घेगडे आदींनी सहकार्य केले. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडागळे यांनी केले तर प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन गहू विशेषज्ञ प्रा.भालचंद्र म्हस्के यांनी केले. या शिवार फेरीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी विद्यार्थी, कृषी विभागाचे कर्मचारी कुंदेवाडी, रौळसपिंप्री आदींसह तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.