जागतिक ग्राहक दिनानिमित्त निफाड तहसील मध्ये ग्राहक जनजागृती कार्यक्रम



प्रतिनिधी  गणेश ठाकरे लासलगाव 

 निफाड येथे तहसील कार्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ मार्च २०२६ रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरवठा निरीक्षक अतुल गायकवाड होते. यावेळी महाराष्ट्र ग्राहक पंचायत निफाड तालुका संघटक किरण जोशी यांनी ग्राहकांनी स्वतः प्रामाणिक राहिल्यास शासन फसवणुकीविरोधात न्याय मिळवून देऊ शकते, असे सांगत ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनीही जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष वसंत दंडवते यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले, दुय्यम निबंधक जगताप मॅडम, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, निफाडचे पोलिस कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, निफाड तालुका ग्राहक पंचायत सचिव डॉ.सौ.सीमा डेर्ले, सहसंघटक नारायण पिंपळे, प्रवासी महासंघाचे सदस्य विजय पाटील, प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, आशाताई पाडाळकर, स्वस्त धान्य दुकानदार, त्यांचे पदाधिकारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.