किरण माने इंदापूर प्रतिनिधी
कडबनवाडी १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच दादासाहेब जाधव ध्वजारोहण करून,राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.तसेच गावकचऱ्याविषयी मुक्त अभियान संदर्भात माहिती देऊन, गावकचऱ्याविषयी अभियान राबवण्याचे आव्हान केले.गावामध्ये जनजागृती करून, फेरी ही काढण्यात आली.
यावेळी सरपंच दादासाहेब जाधव उपसरपंच आप्पासाहेब गावडे भा.कि.मोर्चा उपाध्यक्ष माऊली चवरे, मुख्याध्यापक उमेश सुपते, तात्याराम खोमणे, महेश गावडे तसेच विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.