श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित पंचवटी विभागातील श्री स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेल सेवा केंद्रामध्ये महिन्याच्या दर एकादशीला होणार आता अखंड वीणा वादन प्रहर सेवा, गुरु पिठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने या प्रहार सेवेचा शुभारंभ आज मोहिनी एकादशी निमित्त झाला असून सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत प्रहर सेवा होणार आहे,
गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याकडून वेद वदवले त्या रेड्याची समाधी आळेफाटा जवळ पुणे जिल्ह्यात आहे. साडेसातशे वर्षे झालेत रेड्याला समाधी घेऊन पण आज ही रेड्याच्या समाधी जवळ विना खाली ठेवलेला नाही, हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महिन्याच्या दर एकादशीला अखंड विनावादन सेवा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सर्वच सेवा मार्गात होणार आहे.