ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात अव्वल ! ईशिता किशोर देशात पहिली!


यूपीएससीचा निकाल जाहीर पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका

नवी दिल्ली: यूपीएससी परीक्षा २०२२चा निकाल जाहीर झाला असून, पहिल्या चार रॅकवर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये ईशिता किशोर हिने देशात पहिली रँक मिळवली आहे. दुसऱ्या रॅकवर गरिमा लोहिया, तर तिसऱ्या रँकवर उमा हारिथी एन. तर चौथ्या क्रमांकावर स्मृती मिश्रा हिचा क्रमांक आहे. तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आहे.

यूपीएससीच्या माहितीनुसार, या परीक्षेत ९३३ उमेदवार पात्र ठरले असून, पहिल्या चारही स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. ईशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आहे. यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय. वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतीक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे पाटील १४६ वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्निल पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक, संकेत गरुड ३७० वा क्रमांक, ओमकार गुंडगेने ३८० वा क्रमांक, परमानंद दराडे ३९३ वा क्रमांक, मंगेश खिलारीने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे.


    UPSC CSE 2022 मध्ये एकूण ९३३ उमेदवार निवडले गेले आहेत. यामध्ये ६ १३ पुरुष आणि ३२० महिला उमेदवारांचा समावेश आहे. एकूण ३४५ उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 99EWS, 263 OBC, 154 SC, आणि 72 हे ST प्रवर्गातील आहेत. याशिवाय १७८ उमेदवारांना राखीव यादीत ठेवण्यात आले आहे.